दुसऱ्या राज्यातील लोकसभा खासदारकीला उभे असलेल्या उमेदवारांचे मराठीशी कनेक्शन
मुंबई – बिहारच्या सीतामढीमधून जनता दल युनायटेड तर्फे निवडून आलेले अस्खलितपणे मराठी बोलणारे देवेंद्र ठाकूर हे २०२४ च्या लोकसभेवर निवडून येऊन पोहोचले आहेत. ठाकूर यांचे घर मुंबईत असले तरी ते मूळचे बिहारचे आहेत. त्यांचे शालेय शिक्षण महाराष्ट्रातील नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये झाले आहे तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले आहे.त्यावेळी ते युवक काँग्रेसचे काम करत होते. पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे उच्च विभूषित नेते व तत्कालीन मंत्री प्रा.रामकृष्ण मोरे यांच्या संपर्कात आल्याने ते राजकारणात सक्रिय झाले होते. बिहार विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघातून ते सातत्याने निवडून गेलेले आहेत. बिहार विधान परिषदेचे सभापतीपदही त्यांनी भूषविले होते.

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि प्रचंड मताधिक्याने विदिशा मतदारसंघातून लोकसभा जिंकलेले शिवराज सिंह चव्हाण यांची सासरवाडी गोंदिया आहे .मध्य प्रदेशातील सागर मतदारसंघातून चार लाख 71 हजार मतांनी जिंकलेल्या लता वानखेडे यांचे महाराष्ट्रातील नागपूरची जवळचे नाते आहे त्यांचे माहेर नागपूरला लागून असलेल्या छिंदवाड्याचे पण त्यांचे बरेचसे नातेवाईक नागपुरात राहतात .त्या कुणबी समाजाचा असून नंदकिशोर वानखेडे यांची विवाह झाल्यानंतर त्या सागरला गेल्या.तिथे मध्यप्रदेशातील सर्वात मोठ्या मकरोनिया या ग्रामपंचायतीच्या तीन वेळा सरपंच होत्या. त्यांनी महिला आयोगाचे राज्याध्यक्षपद आणि प्रदेश भाजप महिला आघाडीचे अध्यक्षपदही भूषविले आहे.
गुजरातच्या गांधीनगर मधून मोठ्या फरकाने विजय मिळवलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सासरवाडी कोल्हापूरची आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरुण पटनायक यांचा ओडिशातील पुरी मतदारसंघातून पराभव झाला.ते नवीन पटनायक यांच्या नेतृत्वातील बिजू जनता दलाचे उमेदवार होते मात्र भाजपचे संबित पात्रा यांनी त्यांचा एक लाखावर मतांनी पराभव केला.मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरुण पटनायक हे 2019 मध्येही बिजू जनता दलाच्या वतीने भुवनेश्वर मधून लढले होते आणि भाजपच्या अपराजिता सरंगी यांच्याकडून पराभूत झाले होते.महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह हे उत्तर प्रदेशातील जौनपुर मतदारसंघात भाजपच्या वतीने निवडणूक लढले होते.त्यांचा समाजवादी पार्टीचे बाबूसिंह कुशवाह यांनी एक लाख मतांनी पराभव केला.बॉलीवूड कारर्किद गाजवणाऱ्या आणि मुंबईशी घट्ट नाते असलेल्या हेमामालिनी तिसऱ्यांदा मथुरा मतदारसंघातून भाजपाकडून विजयी झाल्या आहेत.शॉटगन शत्रुघ्न सिन्हा पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर तर कंगना राणौत हिमाचल प्रदेशातील मंडीतून लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक जिंकल्या आहेत.