अन्नदानासाठी भाविकाकडून ५ लाख एक हजाराचा धनादेश

अन्नदानासाठी भाविकाकडून ५ लाख एक हजाराचा धनादेश

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – सदर बाजार सातारा येथील विठ्ठलाचे निस्सीम भक्त बजरंग बाबुराव बाचल यांनी अन्नछत्रासाठी ५ लाख एक हजार रुपयांचा धनादेश पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस दिला आहे .

श्री विठ्ठलावर त्यांची नितांत श्रद्धा असून, आपल्या हातून विठ्ठलाची सेवा घडावी तसेच अन्नदान घडावे अशी त्यांची इच्छा असल्याने सहकुटुंब दर्शनाला आले असता त्यांनी सदरचा धनादेश दिला.

यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार मंदिर समितीचे कर्मचारी योगेश कागदे यांच्या हस्ते देवाचे उपरणे, दैनंदिनी आणि श्रींची प्रतिमा देऊन करण्यात आला.त्यावेळी देणगीदार सहकुटुंब उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top