मोहोळ तालुक्यातील पापरी, येवती,कान्हेरी,खंडाळी आदी गावांना अवकाळी पाऊस,वादळ वाऱ्याचा जोरदार फटका

मोहोळ / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०५/२०२४- दि.२६ मे २०२४ रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, वादळ वाऱ्याचा मोहोळ तालुक्यातील पापरी, येवती, कान्हेरी, खंडाळी आदी गावांना याचा जोरदार फटका बसला आहे.

यात अनेक घरांवरील पत्रे उडाले,शेती फळबागांचे नुकसान झाले, गुरे मरण पावली असून काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळाल्यामुळे सोलापूर च्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आज दि.२७ मे २०१४ रोजी या गावांना भेट देऊन पाहणी केली ग्रामस्थांना धीर दिला.तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

यावेळी ग्रामस्थांसोबत सुलेमान तांबोळी, राजेश पवार,मनोज यलगुलवार,निलेश जरग,कुमार गोडसे,अतुल फराटे,दत्तात्रय कदम,उत्तम मुळे, उत्तम कदम, शिवाजी भोसले, अजित भोसले यांच्यासह इतर उपस्थित होते.