या भूमिकेतून संत म्हणून स्वीकारले इतकेच नव्हे तर पांडुरंगाच्या मंदिरासमोर संत चोखोबांची समाधी बांधली
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९/०५/२०२४- विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म !! भेदाभेद भ्रम अमंगळ !! या विचारसरणीने वाटचाल करणारा वारकरी संप्रदाय श्री विठ्ठलाच्या संतांच्या विचाराने प्रेरित होऊन तेराव्या शतकामध्ये ज्या संत चोखोबांना जे का रंजले गांजले ! त्यासी म्हणे जो आपुले !! तोचि साधू ओळखावा ! देव तेथेची जाणावा !! या भूमिकेतून संत म्हणून स्वीकारले इतकेच नव्हे तर पांडुरंगाच्या मंदिरासमोर संत चोखोबांची समाधी बांधली.

अशा या क्रांतिकारी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून त्यांच्याच वंशातील महिला भगिनींना संत चोखोबांच्या पुण्यतिथी निमित्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले व ह.भ.प.संजय महाराज देहूकर अध्यक्ष,श्री समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज (संघटना) ,ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर सहअध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर , ह.भ.प. विठ्ठल पाटील (काकाजी) अध्यक्ष, वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र यांच्या उपस्थितीत साडी वाटपाचा कार्यक्रम वारकरी साहित्य परिषदेने शुक्रवार दि.31 मे 2024 रोजी दु.४.०० वा.तुकाराम भवन पंढरपूर येथे आयोजित केला आहे.
या कार्यक्रमासाठी पिढ्यानपिढ्या पंढरपुरात वास्तव्यास राहून संतांच्या विचारांची परंपरा जोपासणाऱ्या सर्वांच्या साक्षीने हा कार्यक्रम संपन्न व्हावा म्हणून सर्वांनी उपस्थित राहावे असे निमंत्रित सदस्य ॲड.किर्तीपाल सर्वगोड,खजिनदार ह.भ.प. निवृत्ती महाराज नामदास,कार्याध्यक्ष ह.भ.प.माधव महाराज शिवणीकर आणि ह.भ.प.विठ्ठल पाटील (काकाजी) अध्यक्ष, वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र यांच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.