गोंदवले येथील भाविकांना समस्त वारकरी मंडळाच्या नियोजित वास्तूमुळे भजन, कीर्तन, धार्मिक सोहळे व राहण्यासाठी चांगली व्यवस्था उपलब्ध होणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते समस्त वारकरी मंडळाच्या वास्तूचे भूमिपूजन

गोंदवले येथील भाविकांना समस्त वारकरी मंडळाच्या नियोजित वास्तूमुळे भजन,कीर्तन, धार्मिक सोहळे व राहण्यासाठी चांगली व्यवस्था उपलब्ध होणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३ :- समस्त वारकरी मंडळ मौजे गोंदवले बुद्रुक,ता माण यांच्या वैष्णवनगर,पंढरपूर येथील नियोजित वास्तूचे भूमिपूजन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, गटविकास अधिकारी सुशील संसारे यांच्यासह गोंदवले बुद्रुक येथील वारकरी भाविक तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र नगरीतले गोंदवलेकर महाराजांचे निस्सिम भक्त गोंदवलेकर महाराजांची पालखी घेऊन विठुरायाच्या नगरीत मोठ्या भक्तीभावाने येतात.पंढरपुरात येणाऱ्या गोंदवले येथील वारकरी भाविकांना समस्त वारकरी मंडळाची नियोजित वास्तूमुळे भजन,कीर्तन, धार्मिक सोहळे याबरोबरच राहण्यासाठी चांगली व्यवस्था उपलब्ध होणार असल्याचे मत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top