बुद्धगया महाबोधी महाविहार येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली बुद्धपूजा
बुद्धगया / मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.31- महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांना जिथे ज्ञान प्राप्ती झाली त्या बुद्धगया येथील पवित्र बोधिवृक्ष आणि महाबोधी महाविहारात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज सहकुटुंब बुद्धपूजा केली.महाबोधी महाविहारात बुद्धवंदना घेण्यात आली. त्यानंतर महाबोधी वृक्षाखाली देशविदेशातील अनेक बौद्ध भंतेंच्या उपस्थितीत ना.रामदास आठवले यांनी सहकुटुंब बुद्धपूजा केली.

यावेळी ना.रामदास आठवले यांच्या मातोश्री दिवंगत हौसाआई आठवले यांच्या स्मृति प्रीत्यर्थ बुद्धपूजा आणि भिख्खू संघाला संघदान भोजनदान देण्यात आले.
भूकंपातील मृतांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
म्यानमार आणि थायलँड या देशात भूकंप होऊन शेकडो लोक मृत्युमुखी पडले.त्या मृतांना यावेळी ना.रामदास आठवले यांच्या उपस्थितीत नैसर्गिक आपत्तीतील बळींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी ना.रामदास आठवले व त्यांच्या पत्नी सौ.सीमाताई आठवले आणि आठवले कुटुंबीय उपस्थित होते.

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाचा सक्रिय पाठिंबा आहे. महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेणार असा निर्धार ना.रामदास आठवले यांनी केल्यानंतर ते महाबोधी महाविहार येथे आल्यानंतर बौद्ध भिक्खू आणि बौद्ध उपासकांनी तसेच महाबोधी महाविहार ट्रस्ट च्या व्यवस्थापनानेही ना.रामदास आठवले यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.यावेळी भदंत हर्षबोधी,भदंत आनंद महास्थवीर, भदंत प्रियपाल महास्थवीर, भदंत प्रज्ञादीप एक महास्थवीर;भदंत आनंद महास्थवीर; भदंत शासनपाल,भदंत ज्ञानवंश आणि थाय लँड म्यानमार; कंबोडिया; श्रीलंका; बांगलादेश; व्हिएतनाम आदी अनेक देशांचे बौद्ध भंते उपस्थित होते.महाबोधी महाविहार ट्रस्ट च्या महाश्वेता महारथी,मेंबर डॉ अरविंद सिंग; प्रकाश जाधव; सचिन मोहिते; सुबोध भारत; मंजू छिबेर; शिवनारायण मिश्रा; चंदन शर्मा; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.