अवैध वाळू वाहतूक करणार्या 3 तरापा महसूल प्रशासनाने केल्या नष्ट
अवैध वाळू उपसा काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज :अवैध वाळू उपसा काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये.रोज मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु असून कोणाचा तरी वरदहस्त असल्याशिवाय एवढी वाळू अवैधरित्या उपसून बिनदिक्कत विकली जात नसते.

अशाच एका ठिकाणी महसूल आणि पोलिस प्रशासनाने मिळून कारवाई केली.यात उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार पंढरपूर सचिन लंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दि. 26 मार्च रोजी गोपाळपूर नजीकच्या चंद्रभागा नदी पात्रामध्ये गोपाळपूर आसबे मळा येथे असणार्या ओढ्यामधील अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणार्या 3 थर्माकोल तरापा नष्ट करण्यात आल्या आहेत.

या कारवाईमध्ये मंडळ अधिकारी पंकज राठोड,संतोष सुरवसे, ग्राम महसूल अधिकारी साईनाथ अडगटाळे,अनिल बागल, सरताज मुजावर,गणेश पिसे,रविकिरण लोखंडे, लोकरे, तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.