सामना दरम्यान या खेळाडूला आला हृदय विकाराचा झटका, रुग्णालयात दाखल



बांगलादेशचा अनुभवी खेळाडू तमीम इकबाल ढाका प्रीमिअर लीगचा सामना खेळत असताना हृदयविकाराचा झटका आला. खेळाडूला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

ALSO READ: KKR vs RCB: विराट कोहलीसाठी चाहता सुरक्षा घेरा तोडून मैदानात पोहोचला, मिठी मारली
तमीम इक्बाल यांना सामन्यात क्षेत्ररक्षण करताना छातीत दुखू लागले. त्यांना ढाक्याबाहेर सावर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी वैद्यकीय पथक सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.  

ALSO READ: आतापर्यंत एवढ्या खेळाडूंनी टी-२० मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले, रोहितच्या नावावर एक खास विक्रम
तमीम इक्बालने चॅम्पियन्स ट्रॉफी पूर्वी निवृत्तीची घोषणा केली होती. त्याने सोशलमिडीया वर लिहिले होते की , मी बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील माझा अध्याय संपला आहे. प्रत्येक खेळाडूला त्याचे भविष्य ठरवण्याचा अधिकार आहे. मी हा निर्णय माझ्यासाठी घेतला आहे. 

तमीम इक्बाल यांनी फेब्रुवारी 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी कसोटी सामने खेळले ज्या मध्ये त्यांनी 38.89 च्या सरासरीने 5134 धावा केल्या या मध्ये  10 शतक आणि 31 अर्धशतकांचा समावेश होता. 

ALSO READ: आयसीसीने स्पर्धेतील सर्वोत्तम संघ जाहीर केला, विजेत्या भारतीय संघातील सहा खेळाडूची निवड
तसेच एकदिवसीय सामन्यात त्यांनी 243 सामने खेळले.आणि 14 शतके आणि 56 अर्धशतकांसह 8357 धावा केल्या. तमीम यांनी आंतरराष्ट्रीय टी -20 सामन्यात 1700 हुन अधिक धावा केल्या.

 

Edited By – Priya Dixit

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top