वरद विनायक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉ.मनोज भायगुडे व ॲड तेजश्री भायगुडे यांच्या संकल्पनेतून पंढरपूर शहर व तालुक्यातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.18:- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वरद विनायक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉ.मनोज भायगुडे व ॲड तेजश्री भायगुडे यांच्या संकल्पनेतून पंढरपूर शहर व तालुक्यातील महिलांसाठी मोफत महिलांची आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या माध्यमातून तालुक्यातील 300 महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली .

यावेळी सीमाताई परिचारक तसेच अंजलीताई आवताडे,सौ सुमित्रा पाटील,सौ विनया परिचारक,सौ शैला सावंत,सौ तृप्ती खरे,सौ साधना भोसले,सौ श्रीमती उज्वला भालेराव,सौ संगीता काळे,स्मिता आधठराव,सौ स्वाती धोत्रें,अनिता पवार यांची उपस्थिती होती.
शिबिरात ॲड तेजश्री भायगुडे यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. महिलांमधील रक्ताची कमतरता, थॉयरॉइड, संधिवात, मासिक पाळी त्रास, गाठी पोटाचे आजार याची माहिती व ते होऊ नयेत याकरीता घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन केले.

दैनंदिन जीवनामध्ये महिला या नेहमीच गृहिणी म्हणून कामकाजात व्यस्त असतात.महिला सक्षम तर कुटुंब सक्षम अशी विचारधारा जोपासणारे भायगुडे परिवार यांनी पुन्हा एकदा महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर घेऊन सर्वसामान्य महिलांचे मोफत उपचार करून पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांची मने जिंकले असल्याचे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले .
यावेळी पंढरपूर शहरातील तज्ञ डॉ.श्वेता सुडके,डॉ महेश सुडके,डॉ.स्वाती बोधले,डॉ.एकनाथ बोधले,डॉ.संग्राम गायकवाड,डॉ.स्नेहा नागणे,डॉ.राहुल नागने,उर्मिला उवरे,डॉ. मयुरी तंटक यांच्यासह अनेक डॉक्टरांनी शिबीरास भेट दिली. यावेळी आलेल्या सर्व डॉक्टरांचा यशोचित सन्मान वरद विनायक हॉस्पिटल आणि भायगुडे परिवार यांच्यावतीने करण्यात आला.यावेळी डॉ.अजित त जाधव,सौ.अश्विनी जाधव,डॉ.दिपा घाडगे,डॉ.प्रवीण बाबर,डॉ.अंजली बाबर,डॉ. धवल सावताडे,डॉ.शितोळे आदी उपस्थित होते.

प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी वरद विनायक हॉस्पिटल व मंगल नेत्रालयाच्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.