माचणूर येथील सिध्देश्वर मंदिर परिसराची जयहिंद करीअर अकॅडमीच्या मुलांनी केली स्वच्छता
मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज-तिर्थक्षेत्र माचणूर येथील श्री सिध्देश्वर देवस्थानच्या यात्रेची सांगता झाल्यानंतर येथील जयहिंद करीअर अकॅडमीच्या 40 मुलांनी सामाजिक काम म्हणून या मंदिर परिसराची स्वच्छता करुन परिसर स्वच्छ केला.

तिर्थक्षेत्र माचणूर येथील श्री सिध्देश्वर देवस्थानची यात्रा महाशिवरात्रीनिमित्त पाच दिवस भरते.मंदिर परिसरात व्यापार्यांनी मेवा मिठाई,रसपान गृहे,जनरल स्टोअर्स तसेच अन्य विविध व्यापार करणारे येथे आल्याने यात्रा संपल्यानंतर या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते.त्यामुळे येथील जयहिंद करीअर अकॅडमीचे संचालक तानाजी शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली 40 मुलांनी स्वेच्छेने येथील परिसर स्वच्छ करण्याचे काम युध्द पातळीवर पुर्ण केले.हा कचरा गोळा करुन त्याला अग्नी देवून त्याची विल्हेवाट लावली आहे.गेली सहा वर्षे जयहिंद ॲकॅडमी यात्रा संपल्यानंतर मंदिर परिसरातील स्वच्छेतेचे काम करीत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.