जागतिक महिला दिनानिमित्त दौलतराव विद्यालय कासेगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने 50 सायकल वाटप
पंढरपूर/शुभम लिगाडे,दि.8 मार्च- पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील दौलतराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कासेगांव येथे विद्यार्थिनींना ग्रामपंचायत कासेगावमार्फत 50 गरजू होतकरू विद्यार्थिनींना जागतिक महिला दिनानिमित्त सायकल वाटप करण्यात आल्या.

या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आले.यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष,प्रमुख पाहुणे,सायकल लाभार्थी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी संस्थेचे संचालक, जिल्हा परिषद सदस्य वसंत देशमुख, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रगतशील द्राक्ष बागायतदार चंदूकाका देशमुख, सरपंच शिवाजी भोसले,उपसरपंच संग्रामसिंह देशमुख, ग्रामपंचायत सदस्य,आजी माजी सदस्य, सरपंच,उपसरपंच, प्रशालेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीं तसेच ग्रामस्थ, पालक उपस्थित होते.
