लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत नारी शक्ती व सामान्यांची जनशक्ती नक्कीच करणार नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान… डॉ.नीलम गोऱ्हे
शिवसेना नेत्या डॉ. गोऱ्हे यांचा लोकसभा प्रचार प्राथमिक अहवाल
मुंबई : लोकसभा निवडणूक १६ मार्च, २०२४ रोजी जाहीर झाली. यानंतर पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रचारासाठी श्री गणेशा पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी रामटेक येथील उमेदवार राजू पारवे यांच्या सभेपासून केला. मुख्यमंत्री श्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस-रिपब्लिकन पार्टी-राष्ट्रीय समाजवादी पक्ष या मित्रपक्षांच्या महायुतीने ४८ जागांवर उमेदवार उभे करण्यात आले होते. या लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षाने डॉ.गोऱ्हे स्टार प्रचारक म्हणून निवड करत एक मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवून जो विश्वास शिवसेना मुख्य नेते म्हणून श्री.शिंदे यांनी दाखविला त्याबाबद्दल त्यांचे आभारी डॉ.गोऱ्हे यांनी मानले आहे.
- भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत पुणे व माढा, मुंबई येथील प्रचार सभेत डॉ.गोऱ्हे उपस्थित होत्या.
- बारामती महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार, पुणे उमेदवार मुरलीधर मोहोळ, शिरूर लोकसभा उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेनेचे शिर्डी महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा फॉर्म भरण्यासाठी उपस्थित राहण्यासाठी सांगितले आणि त्याठिकाणी डॉ.गोऱ्हे यांनी सभेस उपस्थित राहून पक्षाची भूमिका, महायुतीचे सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा त्यानी मांडला होता.
- स्टार प्रचारक म्हणून संधी मिळाल्यांनंतर डॉ.गोऱ्हे यांनी अंदाजे ५ महिला मेळावे, २० सभा, ५ चौक सभा, १५ पत्रकार परिषद घेऊन महायुतीच्या उमेदवारांना निवडणूक देण्यासाठी प्रचार केला.दूरदर्शन, आकाशवाणी तसेच विविध वाहिन्यांच्या माध्यमातून महायुती सरकारने केलेल्या लोकहिताची कामे, पक्षाची भूमिका याबाबत विवेचन केले डॉ.गोऱ्हे यांनी केले.
- विदर्भात यवतमाळ येथील शिवसेना उमेदवार सौ.राजश्री पाटील, बुलढाणा येथील उमेदवार प्रतापराव जाधव, छत्रपती संभाजीनगर उमेदवार संदीपान भुमरे, कोल्हापूर उमेदवार संजय मंडलिक, मावळ उमेदवार श्रीरंग बारणे, नाशिक उमेदवार हेमंत गोडसे, हातकलंगले उमेदवार धैर्यशील माने, मुंबई दक्षिण मध्य उमेदवार राहुल शेवाळे,शिर्डी उमेदवार सदाशिव लोखंडे , महायुतीचे उमेदवार ऍड. उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणी डॉ.गोऱ्हे यांनी सभा घेतल्या.
- सर्व ठिकाणी डॉ.गोऱ्हे यांनी पक्षाची भूमिका मांडण्यासोबतच स्थानिक आमदार आणि खासदार यांच्याशी समन्वयासाठी मदत केली. त्याचबरोबर महिला आघाडीला प्रचारात सहभागी करून घेण्यासाठी जे काही विशेष प्रयत्न करता येतील ते प्रयत्न केले. पक्षाबद्दल चे अपप्रचार गैरसमज केला जातो त्याची प्रत्युत्तर ही सभेतून दिली. परंतु आपल्याकडे जे कार्य आपण केलेले आहे आणि सरकारने केलेले कार्य आणि केंद्र सरकारचे कार्य विशेषतः शेतकरी, समाजकल्याण, महिला बालविकास, नगर विकास, ग्रामीण विकास, पायाभूत सुविधा विविध समाजाचे घटकांच्या संदर्भातलं काम उद्योग अशा बाबतचं तपशीलवार टिपणे देखील पत्रकारांना सादर केल्या. याचा उपयोग अनेक वर्तमानपत्रात आणि इतरत्र केलेला दिसू लागला असे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. • महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये आयोजित जाहीर सभांना संबोधित केले तसेच पदयात्रेत सहभागी झाले. याखेरीज पदाधिकारी बैठका, घेण्यात आल्या. यादरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत प्रचारासाठी आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून महायुती सरकाने केलेले विकासात्मक कार्य मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे काम डॉ.निलम गोऱ्हे यांना करता आले याचा विशेष आनंद वाटत असल्याचे त्यांनी सांगतिले. डॉ.गोऱ्हे लोकसभा प्रचाराचा सविस्तर अहवाल लवकरच सादर करणार असल्याचे सांगण्यात आले.