मंगळवेढ्यात प्रज्ञा शोध परिक्षा सुरळीतपणे पडली पार
मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज- मंगळवेढ्यात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून प्रज्ञा शोध परिक्षा दि.2 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत घेण्यात आली.

या परिक्षेला मंगळवेढा शहरात एक व ग्रामीण भागात दोन परिक्षा केंद्रे होती.इयत्ता चौथी 542,सातवी 103 अशा एकूण 645 मुलांनी परिक्षा दिली असून कॉपीमुक्त वातावरणात सुरळीतपणे या परिक्षा पार पडल्याची माहिती प्र. गटशिक्षणाधिकारी डॉ.बिभीषण रणदिवे यांनी दिली.
मंगळवेढा शहरातील ज्ञानदीप विद्यालयात एकूण 8 ब्लॉक तर स्वामी विवेकानंद विद्यालय गोणेवाडी येथे 8 तसेच संत सद्गुरु बागडे महाराज विद्यालय बावची येथे 7 असे एकूण परिक्षेसाठी या तीन केंद्रावर 23 ब्लॉकची व्यवस्था करून दोन्ही इयत्तेच्या मिळून एकूण 645 विद्यार्थ्यानी परिक्षा दिली. कॉपीला प्रतिबंध करण्यासाठी या केंद्रावर बैठे पथके नेमण्यात आल्याचे सांगण्यात आले.प्र.गटशिक्षणाधिकारी रणदिवे यांनी तीनही केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देवून परिक्षेची पाहणी केली.