सोनके तालुका पंढरपूर येथील बँक ऑफ इंडिया शाखेचे मॅनेजरपदी प्रशांत कांबळे यांची नियुक्ती
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- तिसंगी सोनके तालुका पंढरपूर येथील बँक ऑफ इंडिया शाखेचे मॅनेजरपदी प्रशांत कांबळे यांची नियुक्ती झाली आहे.

त्यांच्या या नियुक्तीबद्दल सोनके ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.प्रशांत कांबळे यांच्या सत्कार प्रसंगी बँकेतील सर्व स्टाफ श्री गव्हाणे,प्रवीण कुमार, प्रवीण चौगुले,अतुल चंदनशिवे ,प्रकाश चंदनशिवे, दीपक मासाळ ,सोमनाथ निंबाळकर तसेच तिसंगी सोनके चे पशुधन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.डी एस गायकवाड, दत्तात्रेय ब हाके, डॉ.श्री बोरकर, माऊली कारंडे, चेतन काळे सत्यवान मस्के शुभम महानवर प्रवीण काळे ,सर्जेराव मासाळ, अक्षय सुतार आदींसह ग्रामस्थ,खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.