पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव गोरे यांचे दुःखद निधन
माण / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०२/२०२५- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज कॅबिनेट मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे यांचे आज मंगळवार दि.२५ फेब्रुवारी रोजी पहाटे प्रदीर्घ आजाराने वयाच्या ७५ व्या वर्षी पुणे येथे दुःखद निधन झाले.मागील काही दिवसांपासून पुण्यात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी आज मंगळवार दि.२५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत त्यांच्या बोराटवाडी, ता.माण,जि.सातारा येथील निवासस्थानी येथे ठेवण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर बोराटवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भगवानराव रामचंद्र गोरे यांच्या पश्चात अंकुश,जयकुमार,शेखर हे पुत्र व कन्या सौ. सुरेखा,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.