पालघर पोलीस दलाकडुन महाविद्यालयीन विद्यार्थी,महिला दक्षता समिती यांच्याकरीता सायबर प्रशिक्षण कार्यक्रम

पालघर पोलीस दलाकडुन महाविद्यालयीन विद्यार्थी,महिला दक्षता समिती यांच्याकरीता सायबर प्रशिक्षण कार्यक्रम

पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज-सध्याच्या डिजीटल युगात प्रत्येक व्यक्ती मोबाईल फोन, इंटरनेटचा वापर करत आहे. सायबर गुन्हेगार नागरिकांना वेगवेगळे आमिष दाखवणारे फोन कॉल करत असतात.काही नागरिक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत. त्यामुळे सायबर गुन्हयाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे.पालघर जिल्ह्यातील नागरिक सायबर गुन्ह्यांना बळी पडु नये तसेच त्यांचेमध्ये सायबर साक्षरता निर्माण करण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील पालघर यांच्या संकल्पनेतुन जनसंवाद अभियान अंतर्गत सायबर सुरक्षीत पालघर ही मोहिम राबविण्यात येत आहे.

मुख्यमंत्री महोदय यांचे ७ कलमी कार्यक्रमा अंतर्गत सध्या पालघर जिल्ह्यात सायबर पोलीस ठाणे पालघर यांचेकडून सायबर सुरक्षित पालघर ही मोहिम राबविण्यात येत असून सदर मोहिम सर्व नागरिकांपर्यंत पोहोचणे व जनजागृती होणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने दि. १८/०२/२०२५ रोजी जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, , पालघर यांचे अध्यक्षतेखाली सायबर सुरक्षित पालघर मोहिमेअंतर्गत सायबर योध्यांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी सोनोपंत दांडेकर कॉलेज पालघर, चाफेकर कॉलेज पालघर,आय.डि.एल. कॉलेज पालघर,सी.एस.पी.कॉलेज आशागड,थीम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बोईसर,सेंट जॉन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पालघर या महाविद्यालयातील एकूण ४०० विद्यार्थी तसेच महिला दक्षता समितीच्या एकूण ३३ महिला उपस्थित होत्या.

सदर कार्यक्रमात सायबर योद्धा यांना सायबर गुन्ह्याची ओळख,सायबर गुन्हे होण्याची पद्धती,सायबर गुन्हे घडल्यानंतर (गोल्डन अवर) पहिल्या एक तासात करावयाची कामगिरी, नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर तक्रारी कशी नोंदवावी,मोबाईल हरविल्या नंतर सी.ई.आय.आर.पोर्टलवर तक्रार कशी नोंदवावी याबाबत माहिती देवुन सायबर सुरक्षित पालघर ही व्हिडीओ क्लीप दाखविण्यात आली तसेच सायबर गुन्हे घडल्यानंतर जनतेला कशी मदत करण्यात यावी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

सदर कार्यक्रम हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील पालघर,अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे पालघर, पोलीस उपअधीक्षक (गृह) श्रीमती संगिता शिंदे अल्फांन्सो पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली परि.पोलीस उपअधीक्षक, श्रीमती भागीरथी पवार,पोलीस निरीक्षक अजय गोरड प्रभारी अधिकारी सायबर पोलीस ठाणे, पोलीस उप निरीक्षक रुपाली गुंड सायबर पोलीस ठाणे, म.पो.ना.कविता पाटील, म.पो.शि. मोनिका तिडके,पो.अं.रामदास दुर्गेष्ट, पो.अं.अक्षय शेट्ये, पो.अं.रुपेश पाटील,पो.अं.रोहित तोरस्कर सर्व नेमणुक सायबर पोलीस ठाणे, पालघर व इतर अंमलदार यांनी यशस्विरित्या पार पाडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top