उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना आगामी आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे केले आवाहन

उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना आगामी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे केले आवाहन

सर्व पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत महापालिका निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळविण्यासाठी केला संकल्प

मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/०२/२०२५- वरळीच्या एनएससीआय डोम सेंटरमध्ये आज मुंबईतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला.यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करून आगामी आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

गेल्या अडीच वर्षात सरकारने मुंबई आणि राज्यात केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवा. प्रत्येक वॉर्डात शिवसेनेच्या शाखा आणि घर तिथे शिवसैनिक झाला पाहिजे, अशा सूचना यावेळी उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना केल्या. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर शिवसेना आता महापालिका निवडणुकीसाठी सज्ज असून त्यासाठी अगदी जोशाने कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले. सर्व पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत महापालिका निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळविण्यासाठी संकल्प केला.

यावेळी उबाठा गटाचे विलेपार्ले उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळे, युवती सेनेच्या अजिता जनावळे, उपविभागप्रमुख अनिल खांडेकर, हनी सबलो, शरद पवार गटाचे मुंबई सचिव सतीश नायर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

या बैठकीला शिवसेना नेते रामदास कदम, विधानसभेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, खासदार रवींद्र वायकर,खासदार डॉ श्रीकांत शिंदे,आमदार प्रा.मनीषा कायंदे,शिवसेना सचिव सिद्धेश कदम आणि शिवसेनेचे सर्व खासदार,आमदार,नेते, उपनेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top