आ समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून रुग्णांना मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधीतून मदत
या अभियानाचा संघातील रुग्णांना जास्तीत जास्त लाभ होण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांच्या पंढरपूर व मंगळवेढा येथील जनसंपर्क कार्यालयामार्फत प्रयत्न

मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी,दि.१७- सरकारचे महत्वकांक्षी असलेले अभियान म्हणजे मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधी या निधीतून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून मतदार संघातील रुग्णांना आर्थिक स्वरूपात यांच्या बँक खात्यावर थेट रक्कम जमा झाली आहे.
यामध्ये अद्विक कांबळे, रेखा जाधव तसेच समान भगवान रजपूत या रुग्णांना प्रत्येकी एक लाख रुपये आरोग्य अर्थसहाय्य प्राप्त झाल्याने त्यांच्या उपचारासाठी मोठे सहकार्य लाभले आहे.आपल्या छोट्या मोठ्या आजाराच्या निमित्ताने हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना आर्थिक कुवती अभावी आवश्यक उपचाराची वाणवा भासू नये यासाठी मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधीतून मदत करण्याचे शासनाचे थेट धोरण आहे.

या अभियानाचा संघातील रुग्णांना जास्तीत जास्त लाभ होण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांच्या पंढरपूर व मंगळवेढा येथील जनसंपर्क कार्यालयामार्फत येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना योग्य ते मार्गदर्शन व कागदपत्रांची पूर्तता करून मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मतदार संघातील रुग्णांना अशी मदत मिळत असल्याने रुग्णांना मोठे आर्थिक सहकार्य लाभणे शक्य झाले आहे.
