पंढरीत दुसरे राज्यस्तरीय कलाशिक्षक अधिवेशन संपन्न

पंढरीत दुसरे राज्यस्तरीय कलाशिक्षक अधिवेशन संपन्न

या अधिवेशनामध्ये भारत सिध्देश्वर माळी सर,सचिव सावित्रीबाई फुले चित्रकला महाविद्यालय यांना कलाप्रेमी पुरस्कार

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघ व सोलापूर जिल्हा शैक्षणिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरे राज्यस्तरीय कलाशिक्षक अधिवेशन नुकतेच पंढरपूर येथे संपन्न झाले. या अधिवेशनाला माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत हे स्वागताध्यक्ष होते. या अधिवेशनास नाशिक विभाग शिक्षक आमदार केशव दराडे व नाशिक विभाग पदवीधर आमदार सत्यजीत तांबे यांनी विशेष सहकार्य केले.

अधिवेशनाच्या शुभारंभप्रसंगी स्वागताध्यक्ष दत्तात्रय सावंत, कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष शेरशाह डोंगरी,सरचिटणीस शालीग्राम भिरूड, सोलापूर जिल्हा अध्यक्ष शशिकांत सदाफुले,सचिव संतोष धारेराव व बहुसंख्येने कलाशिक्षक उपस्थित होते.

या अधिवेशनामध्ये भारत सिध्देश्वर माळी सर,सचिव सावित्रीबाई फुले चित्रकला महाविद्यालय यांना कलाप्रेमी पुरस्कार देण्यात आला.तसेच सावित्रीबाई फुले चित्रकला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी अमित मुकूंद वाडेकर सर यांना आदर्श कलाशिक्षक पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर १० हुन अधिक कलाशिक्षकांना जीवनगौरव व आदर्श कलाशिक्षक पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले.

Leave a Reply

Back To Top