यंदाचा आदर्श बॅंक २०२५ पुरस्कार दि पंढरपूर मर्चंट्स को-ऑप.लि.,पंढरपूर बँकेला

यंदाचा आदर्श बॅंक २०२५ पुरस्कार दि पंढरपूर मर्चंट्स को-ऑप.लि.,पंढरपूर बँकेला

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज-सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स को.ऑप.असोसिएशन सोलापूर तर्फे देण्यात येणारा यंदाचा आदर्श बॅंक २०२५ पुरस्कार दि पंढरपूर मर्चंट्स को-ऑप.लि.,पंढरपूर बँकेला देण्यात आला.

दि पंढरपूर मर्चंट्स को-ऑप.लि.,पंढरपूर या बँकेला ठेवी रुपये २०१ ते ५०० कोटी या वर्गवारीमध्ये तृतीय क्रमांकाचा आदर्श बॅंक २०२५ पुरस्कार मिळाला सोलापूर येथील हिराचंद नेमचंद वाचनालय ॲम्फी थिएटर मध्ये झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र स्टेट को.ऑप बँक फेडरेशन लि., मुंबईचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा यांच्या हस्ते व शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख, शहर मध्य चे आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दि पंढरपूर मर्चंट्स को-ऑप बँक लि.,पंढरपूर बँकेने आजपर्यंत सर्वसामान्य सभासद व ग्राहकांना तत्पर सेवा व बँकिंग क्षेत्रातील सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे व ग्राहकांच्या नावलौकिकास पात्र ठरलेल्या या बँकेला आदर्श बँक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स को.ऑप.असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश वाले,सहकारी संस्था उपनिबंधक किरण गायकवाड,अस्मिता गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या बँकाच्या कामाची पोचपावती व त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून हा पुरस्कार देण्यात येतो.

यावेळी बोलताना अजय ब्रम्हेचा यांनी केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयामार्फत सहकारी बँकाकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच आरबीआय ने सुद्धा सहकारी बँकांचा गुणात्मक दर्जा वाढल्याचे व सर्वसामान्य लोकांना आर्थिक पतपुरवठा करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम नागरी सहकारी बँकेने केले आहे असे सांगितले तसेच नागरी सहकारी बँकाही सरकारी बँकांच्या बरोबरीने ग्राहकास विविध सेवा देत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

त्याप्रसंगी बँकेचे माजी चेअरमन नागेश आण्णासाहेब भोसले, माजी चेअरमन सोमनाथ सदाशिव डोंबे, बँकेचे उपाध्यक्ष वसंत धोंडीबा शिखरे,संचालक राजेंद्र पवनलाल फडे,विजयकुमार रामचंद्र परदेशी, भगीरथ औदुंबर म्हमाने,संजय विठ्ठल जवंजाळ,राहुल पांडुरंग शिंदे नाईक, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या अध्यक्षा सौ.मंजुश्री सुधीर भोसले, तज्ञ संचालक सुनिल गंगाधर मोहिते ,व्यवस्थापक अतुल महादेव म्हमाने, उपव्यवस्थापक रमेश नारायण कुलकर्णी व बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top