लेखक कवी जगदीशचंद्र यांचा राष्ट्रीय हिंदी साहित्य अधिवेशनात सन्मान
सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर येथील लेखक कवी डॉ जगदीशचंद्र कुलकर्णी यांनी पूर्वांचल मानस मंडळ आणि नेहरू युवा केंद्र मुंबई द्वारा आयोजित राष्ट्रीय हिंदी साहित्य अधिवेशनात भाग घेतला होता.त्यांना वरील अधिवेशनात निमंत्रित साहित्यिक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते .या राष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलनाला मुंबई विद्यापीठ यांनी सहकार्य केले होते.हे अधिवेशन मुंबई विद्यापीठ सांताक्रूझ येथे 1आणि 3 फेब्रुवारी 2025 कालावधीत आयोजित करण्यात आले.या अधिवेशनात डॉ जगदीशचंद्र कुलकर्णी यांनी संस्कार,पानी इत्यादी कवितांचे वाचन केले.

त्यांनी आपल्या भाषणात हिंदी राष्ट्र भाषा झाली पाहिजे, हिंदी साहित्य दक्षिणेत वाढत आहे.काही राजकीय नेत्यांचा आडमुठपणा, दुराग्रही विचारामुळे आज हिंदी राष्ट्र भाषा होत नाही. सामान्य लोकात हिंदी लोकप्रिय आहे याबाबत चर्चा केली .
त्यांचा सत्कार अध्यक्ष राजेश असरदार यांनी शाल श्रीफल भेट वस्तू सहभाग फोटो प्रमाणपत्र देवून केला.त्यावेळी संगीत साहित्य मंच,साहित्य परिषद,मुंबई,उज्वल भारत सेवा इत्यादी विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कुलकर्णी यांनी विश्व मराठी संमेलनमध्ये पुणे येथे भाग घेवून विविध कार्य केले आहे त्यामुळे त्यांना निमंत्रित साहित्यिक म्हणून महाराष्ट्र शासनाने आमंत्रित केले होते. कुलकर्णी यांनी सोलापूर युनिव्हर्सिटी आयोजित इंटरनॅशनल कॉन्फरन्स ट्रान्स जेंडर लिव्हज मध्ये भाग घेतला.ही कॉन्फरन्स 2 दिवसीय होती. त्यांनी तृतीय पंथीयांचे प्रश्न जाणून घेतले .डॉ संवानी जेठवानी सदस्य ट्रान्सजेंडर वेल्फेअर बोर्ड यांच्याशी चर्चा केली.

कुलकर्णी यांनी हरिद्वार लखनौ, अयोध्या उदयपूर वाराणसी आग्रा बंगलोर इत्यादी कॉन्फरन्स मध्ये भाग घेवून रिसर्च पेपर वाचन कार्य केले आहे अशी माहिती प्रसाद कुलकर्णी सहसचिव,सी एम म्हेत्रे फ्रेंड्स सोसायटी दमानीनगर सोलापूर यांनी दिली आहे.