आपल्या मनातील भितीवर आपण विजय मिळवू शकलो तर आपल्याला कुठल्याच गोष्टी विचलित करू शकत नाहीत – पंतप्रधान नरेंद्र मोदी
सकारात्मकता आणि स्वतःशी स्पर्धा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले मंत्र महत्त्वाचे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादर मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा २०२५ हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसोबत पाहिला व त्यानंतर विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, विद्यार्थी जीवनात आलेल्या अडचणीतून कसा मार्ग काढावा यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले आहे. सकारात्मकता आणि स्वतःशी स्पर्धा हे दोन महत्वाचे मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला दिले आहेत,असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आपल्या मनातील भितीवर आपण विजय मिळवू शकलो तर आपल्याला कुठल्याच गोष्टी विचलित करू शकत नाहीत हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला मंत्र सर्वांनीच आत्मसात केला पाहिजे असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी म्हटले.
याप्रसंगी मंत्री आशिष शेलार,आ.संजय उपाध्याय तसेच विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते.