गोव्यात सुरक्षित प्रदूषणमुक्त आणि अपघातमुक्त रस्त्यांसाठी गडकरींचा प्रयत्न
गोवा / ज्ञानप्रवाह न्यूज- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात ६ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली आहे.तसेच त्यांनी रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्यावर भर दिला असून गरज पडल्यास बुलडोझर तैनात करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

वाढती वाहनं आणि नियमांचे पालन न करणे यामुळे सातत्याने होणारी कोंडी आणि वारंवार होणारे अपघात यामुळे जिवित हानीचा धोका वाढत आहे.

गोवा प्रदूषणमुक्त आणि अपघातमुक्त करण्यासाठी अपघात – प्रवण ठिकाणे ओळखून काढण्यावर नितीन गडकरी यांनी भर दिला आहे.
त्यांनी वळणावर भारतातील पहिल्या केबल-स्टेड पुलाचे उद्घाटन केले आणि जागतिक पर्यटनासाठी झुआरी ब्रिज टॉवरवर फिरणारे रेस्टॉरंट प्रस्तावित केले आहे.