हरीऐक्य सायुज्य समाधी सोहळ्या निमित्त श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर धर्माचार्य श्री दत्तात्रय महाराज दहिवाळ १५ फेब्रुवारीस पंढरपूरात …
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि ९- सोनार समाज दैवत श्री संत नरहरी महाराज सोनार हे सदेह पांडुरंगात विलीन झाल्याने त्यांची पुण्यतिथी न करता हरीऐक्य सायुज्य समाधी सोहळा साजरा करण्याचा संदेश देण्यासाठी श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर धर्माचार्य श्री दत्तात्रय महाराज दहिवाळ दत्त दिगंबर पीठ लाडगाव संस्थान हे शनिवार दि.१५ फेब्रुवारीस पंढरीत येत आसल्याची माहीती भारतीय नरहरी सेना प्रणीत सराफ सुवर्णकार संरक्षण समीतीचे प्रदेशाध्यक्ष उमेश बुऱ्हाडे व अॅड विशाल वेदपाठक यांनी प्रसार माध्यमांना दिली .

शके १११५ ते १२०७ या कालावधीत श्री संत नरहरीमहाराज सोनार हे निस्सीम कट्टर शिवभक्त होऊन गेले.संत मांदियाळीत त्यांचे स्थान अग्रभागी आहे .अशा या महान संताला शके १२०७ ला पांडुरंगाने स्वता:च्या कटीत सामावून घेतले अशा संताची पुण्यतिथी केली जाते त्याला तिलांजली देत हरीऐक्य सायुज्य समाधी सोहळा साजरा केला जाणार आहे.

श्री संत नरहरीमहाराज सोनार हे पांडुरंगात विलीन झाल्याने त्यांची पुण्यतिथी न करता दि १५ फेब्रुवारीला श्री विठ्ठलाची तुळशी पुजा धर्माचार्याच्या हस्ते करून संत नरहरींचा जयघोष करत हरीऐक्य सायुज्य समाधी सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्या साठी महाराष्ट्रतून सर्व शाखीय सोनार समाज व नरहरीभक्त पंढरपूरात एकवटणार आहेत.
या हरीऐक्य सायुज्य समाधी सोहळ्यासाठी डॉ राजेंद्र पिंगळे, अर्चनाताई दिंडोरकर, उमाकांत मंडलिक,राजेश टाक, सारीका ताई नागरे ,मोहन पोतदार,लंकेश बुराडे,रविंद्र माळवे ,सनी सोनार,सुनिल अहिरराव आदी सोनार समाज बांधव परिश्रम घेत आहेत.