अंगणवाडी बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पंढरपूरात आरंभ पालक मेळावा

अंगणवाडी बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पंढरपूरात आरंभ पालक मेळावा

बिट एकच्या आरंभ मेळाव्याचे पालकांकडून कौतुक

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज:- एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत घेण्यात आलेल्या आरंभ पालक मेळाव्याचे माध्यमातून अंगणवाडीतील बालकांचे सर्वांगीण विकासासाठी खेळ कृती, स्पर्श कृती, सोप्या पद्धतीने बौद्धिक विकास व्हावा यासाठी शासनाने नुकतेच आरंभ पालक मेळाव्याच्या माध्यमातून पालकांनी शून्य ते तीन वर्षे मुलांकडून घरातच सोप्या पद्धतीने खेळांमधून आपल्या बालकांचा विकास करुन घ्यावा यासाठी या मेळाव्यात विविध प्रकारच्या कृतीचे स्टाॅल उभारण्यात आले होते.

प्रारंभी आरंभ पालक मेळाव्याचे उद्घाटन डॉ. संगीता पाटील यांनी केले.यानंतर एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी किरण जाधव,मुख्य सेविका सारिका सनगर, प्रमुख पाहुणे डॉ संगीता पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी बोलताना डॉ संगीता पाटील म्हणाल्या की, बालकांच्या आयुष्याची सुरुवात कशा प्रकारे व्हावी यासाठी आरंभ पालक मेळावा अतिशय स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे. प्रत्येक पालकाला वाटते आपली मुलं सुंदर,सुदृढ असावीत तसेच बुद्धिमानही असावीत यासाठी शून्य ते तीन वर्षे वयापर्यंतच्या मुलांची जडणघडण वागणे बोलणे ही कृती मुलांवर परिणाम करते.अशा छोट्या छोट्या गोष्टीतून सर्व अंगणवाडी सेविकांनी स्टॉलच्या माध्यमातून दाखवले आहे. बालकांसोबत पालकही याचा आनंद घेत आहेत. आहाराच्या बाबतीतही सुंदर प्रात्यक्षिक दाखवण्यात आले आहे.

बालविकास प्रकल्प अधिकारी किरण जाधव म्हणाले की, बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांचे खेळाकडे लक्ष केंद्रित करून आरोग्याच्या दृष्टीने त्यांना विकसित करण्यासाठी नवनवीन संकल्पना राबवून पालकांनी मुलांचे संगोपन कशा पद्धतीने करावे याची माहिती दिली जात आहे. बालकांच्या मेंदूची वाढ ही पहिल्या दोन वर्षात साधारण ७५ टक्के होते. यावेळेस बालकाच्या आरोग्याबरोबरच सर्वांगीण विकासाकडे व बौद्धिक क्षमतेवर कृती करून घेणे आवश्यक आहे असेही सांगितले.

मुख्य सेविका सारिका सनगर म्हणाल्या की, आरंभ पालक मेळाव्याच्या माध्यमातून आरंभ संकल्पना राबविण्यात येत आहे. बालकांच्या सर्वांगीण विकास कशा पद्धतीने करावा हे प्रत्येक स्टॉलच्या माध्यमातून समजते.मोबाईलचा वाढता वापर कमी करण्यासाठी खूप सार्‍या संकल्पना राबवल्यास मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत मिळेल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

यावेळी पालकांकडून सदर आरंभ पालक मेळाव्याचे कौतुक करण्यात आले व असाच मेळावा वारंवार भरवावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बीट क्रमांक एकच्या सर्व सेविका व मदतनीस यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top