सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या सुकन्येचा विवाह सोहळा संपन्न
सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांची सुकन्या चि.सौ.कां.संजोक्ता आणि कै. मायप्पा घुटूकडे यांचे चि.समाधान (उपजिल्हाधिकारी हिंगोली) यांचा शुभविवाह सोहळा सोलापूर महानगरपाल एक्झीबिशन ग्राऊंड डोणगाव रोड सोलापूर येथे दि.०४ फेब्रुवारी रोजी पार पडला.

हा विवाह सोहळा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे,खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यासह हजारों पाहुणे मंडळी,विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मित्रपरिवाराच्या उपस्थितीत संपन्न झाला.
