तालुक्यातील जनतेच्या समस्यांबाबत प्रांत अधिकार्या॔ना शिवसेनेचे निवेदन
पंढरपूर/-ज्ञानप्रवाह न्यूज-पंढरपूर येथील उपविभागीय कार्यालयामध्ये तालुक्यातील शेतकरी व इतर लोकांच्या शेतीच्या बांधाच्या, रस्त्याच्या मालकी हक्काच्या आदी वाद विवादाच्या केसेसच्या तारखा चालवण्यात येत असतात.

त्याबाबत बऱ्याच वेळा तारखा न चालता बोर्डावर पुढील तारीख उशीरा दिली जाते. पन्नास ते शंभर कि.मी.वरुन तारखेला लोक सकाळपासून येतात त्यात बरेच वृद्ध लोक असतात त्यांचे बाहेर बसुन हाल होतात.ज्या दिवशी तारीख चालणार नाही त्यावेळी लोकांचा हेलपाटा वाचण्यासाठी तारीख अगोदर कळविल्यास तालुक्यातुन येणार्या लोकांचे हेलपाटे व ञास वाचेल यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत असे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रांत अधिकार्यांना लेखी निवेदन देवून या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी शिवसेना जिल्हासंपर्कप्रमुख अनिल कोकीळ,जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख बंडू घोडके, जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे यांनी प्रांत अधिकाऱ्यांकडे निवेदन देवून केली आहे.
या वेळी उपतालुकाप्रमुख संजय घोडके, नामदेव चव्हाण, समाधान गोरे ,भारत कदम, जीवन चव्हाण आदींसह शिवसैनिक व पदाधिकाऱी उपस्थित होते .