सोलापूर शहरातील जड वाहतूक संदर्भात पोलिस आयुक्त एम राजकुमार यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
सोलापूर / प्रतिनिधी-आज दि.२७/०१/२०२५ रोजी पोलिस आयुक्तालय कार्यालय सोलापूर शहर येथील मीटिंग हॉल मध्ये सोलापूर शहरातील जड वाहतूक संदर्भात पोलिस आयुक्त एम राजकुमार यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस जड वाहतूक असोसिएशन चे अध्यक्ष लक्ष्मण विटकर,पदाधिकारी व जवळपास १०० वाहन मालक, बिल्डर्स, कॉट्रॅक्टर उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी खालीलप्रमाणे सूचना दिल्या आहेत –
वाहन मालक यांनी त्यांचे वाहनावर चालक म्हणून हुशार व ज्याला जड वाहन चालविण्याचा ५ वर्षांचा अनुभव आहे अशाच चालकाची नियुक्ती करावी.
शहरातील रस्त्यावर वाहनांचा वेग २० kmph पेक्षा जास्त असू नये.
प्रत्येक वाहनामध्ये डॅशबोर्ड कॅमेरा बसविण्यात यावा.
प्रत्येक वाहन मालकाने आपल्या वाहनाच्या पाठीमागील दर्शनी भागात मोठ्या अक्षरात त्यांचा मोबाईल नंबर टाकावा जेणेकरून चालक रॅश ड्राइविंग करत असल्यास मालकाला संपर्क करता येईल.
वाहन चालकांनी वेग मर्यादा ओलांडू नये.
प्रत्येक वाहन चालकचा व मालकाचा मोबाईल नंबर, ड्राइविंग लायसन्स, आधारकार्ड यांची प्रत वाहतूक शाखेकडे जमा करावी.विशेषत: चालक हा दारू पिऊन वाहन चालवणार नाही याबाबत मालकांनी खात्री करावी.
वाहन चालकाकडून एखादा अपघात घडल्यास वाहन मालकाचीही त्यामध्ये जबाबदारी निश्चित करण्यात येईल.

असोसिएशनच्या अध्यक्षांनी केलेल्या सूचनांवर लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याबाबत पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी संबंधित पोलिस अधिकार्यांना सूचना दिल्या.
वाहनाला डाव्या बाजूस बंधनकारक करा.वाहनात DJ Speaker ला प्रतिबंध करा.वाहनाला मागे पुढे नंबर बंधनकारक करा.वाहनावर शहरवाहतूकच्या संपर्कचे स्टिकर लावा.मटेरीयलवरती जाळी/मेनकापड बंधनकारक करा.वाहन काचेवरील नेत्यांचे स्टिकर हटवा.कर्कश प्रेशर हॉर्नला बंदी करा अशा अनेक महत्वपूर्ण बाबींवरही यात विचार करावा लागेल अशी प्रतिक्रिया ॲड मनिष गडदे पाटील यांनी दिली आहे.
तर निल उंबरगी यांनी प्रश्न विचारला आहे महानगरपालिका, अतिक्रमण विभाग वाहतूक शाखा आणि आरटीओ ज्यांच्या कार्यालयासमोरच विजयपूर रोड अतिक्रमणामुळे ट्रॉफिक जाम होते त्यांची संयुक्त बैठक आयोजित करावी कारण ट्राफिक मोबिलीटी कमिटी सोलापूर महापालिका अस्तित्वात आहे का ?
Solapur City Police