विभागीय रेल्वे समितीवर विनोद भरते यांची निवड

विभागीय रेल्वे समितीवर विनोद भरते यांची निवड

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज-सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत कोषाध्यक्ष विनोद बाळासाहेब भरते यांची निवड झाली आहे.त्याबद्दलचे पत्र रेल्वे विभागातर्फे त्यांना देण्यात आले आहे.

विनोद भरते हे मागील पंधरा वर्षापासून ग्राहक चळवळीत कार्यरत आहेत.तालुका स्तरापासून काम करत ते सध्या मध्य महाराष्ट्र प्रांताचे कोषाध्यक्ष या पदावर काम करीत आहेत.रेल्वे प्रवाशांच्या समस्या,अडचणी त्यांनी सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या निवडीबद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी, संघटक प्रसाद बुरांडे,सचिव संदीप जंगम, प्रांत सदस्य सुभाष सरदेशमुख,जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास,जिल्हा संघटक दीपक इरकल,जिल्हा सचिव सुहास निकते,जिल्हा महिला विभाग प्रमुख सौ.माधुरी परदेशी, जिल्हा सदस्य अण्णा ऐतवाडकर,पांडुरंग अल्लापूरकर,संतोष उपाध्ये, संभाजी लंगोटे, तालुकाध्यक्ष विनय उपाध्ये,उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे,संघटक महेश भोसले,सहसंघटक आझाद अल्लापूरकर, सचिव प्रा.धनंजय पंधे,सदस्य सागर शिंदे,अंकुश वाघमारे,श्रीराम साळुंखे, सतिश निपाणकर, इंद्रजीत फडे, संजय खंडेलवाल यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top