पटवर्धन कुरोली शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा भेट देऊन वाढदिवस साजरा
पटवर्धन कुरोली/ज्ञानप्रवाह न्यूज – पटवर्धन कुरोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचकर वस्ती या ठिकाणी युवा उद्योजक राहुल सर्जे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचकर वस्ती या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा संच भेट देण्यात आला.

यावेळी शाळेच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमासाठी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर,अनिल सावंत,रमेश नाईकनवरे, सरपंच दादा साखरे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मारुती कोळसे, मोहन कोळसे,निलेश गवळी, प्रशांत मलशेट्टी मधुकर नाईकनवरे,दत्तात्रय नाईकनवरे,रमेश चिंचकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सोनवणे सर यांनी केले.आभार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक श्री बोबडे सर यांनी मानले.
