मंगळवेढा शहरात व्यापारी व शेतकर्यांना नाहक त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची आ.समाधान आवताडे यांच्याकडे मागणी

मंगळवेढा शहरातील व्यापारी व शेतकर्यांना नाहक त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची आ.समाधान आवताडे यांच्याकडे केली मागणी

लक्ष्मी दहिवडी/मोहन पाटील/ज्ञानप्रवाह न्यूज-पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे ऑजनसंपर्क कार्यालय, मंगळवेढा येथे मंगळवेढा शहरातील व्यापारी महासंघ पदाधिकारी, उद्योजक-व्यावसायिक तसेच शेतकर्यांनी आपल्या मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांची आमदार दालनात भेट घेऊन लक्ष्मी दहिवडीच काळ्या शिवारातील पिकांना आणि शेतकऱ्यांना विशिष्ट लोकां कडून होणारा नाहक त्रास आणि नुकसानीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

या मंडळींची सदर मागणी लक्षात घेतल्यानंतर आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करुन आवश्यक आणि तात्काळ पोलीस कारवाई करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे निर्देश दिले आहेत.

अखंड मेहनत आणि मुबलक आर्थिक बाबींशी तडजोड करुन पिकवलेल्या धान्यांला पदरी पाडून घेताना शेतकर्याला वेठीस धरण्याचा कोणी प्रयत्न अथवा डाव करत असेल तर त्याची दया न करता त्यावर वेळीच कायद्याचा बडगा उगारला पाहिजे अशा सक्त सूचना आमदार आवताडे यांनी यावेळी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.

यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड, भाजपा जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, माजी नगराध्यक्ष धनंजय खवतोडे,माजी नगरसेवक अरुण किल्लेदार, अजित जगताप, प्रविण हजारे, सतिश हजारे, नितीन सुरवसे, सुशांत हजारे आदी पदाधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top