द.ह.कवठेकर प्रशालेस श्रुती कुलकर्णी व अनुप कुलकर्णी यांची सदिच्छा भेट

द.ह.कवठेकर प्रशालेस जीडीपी पेंटच्या डिस्ट्रीब्यूटर व एसएसआय पेंट च्या प्रोप्रायटर श्रुती कुलकर्णी व अनुप कुलकर्णी यांची सदिच्छा भेट

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज: पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह.कवठेकर प्रशालेस जी.डी. बी.पेंट डिस्ट्रीब्यूटर व एसएसआय कंपनीच्या प्रोपरायटर श्रुती कुलकर्णी व अनुप कुलकर्णी,कन्या जान्हवी कुलकर्णी यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली.कंपनीच्या सी.एस.आर.फंडाच्या माध्यमातून द.ह. कवठेकर प्रशालेस सुमारे तीन लाख रुपयांचा मोफत रंग रोटरीयन धनंजय राजूरकर यांच्या प्रयत्नातून पुरवण्यात आला होता. त्याची पाहणी करण्यासाठी कंपनीच्या उभयतांनी प्रशालेस सदिच्छा भेट दिली.

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.एम. कुलकर्णी सर यांनी त्यांना प्रशालेबद्दलची माहिती दिली.श्रुती कुलकर्णी व अनुप कुलकर्णी यांच्या सामाजिक कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

प्रो.अनुप कुलकर्णी यांनी त्यांच्या एस एस आय कंपनीच्या कार्याबद्दल व सेवेबद्दल माहिती दिली.यावेळी त्यांनी संपूर्ण प्रशालेतील इमारतीच्या रंगकामाची पाहणी केली.प्रशालेस लागेल तेव्हा रंगकामासाठी मदतीचा हात देण्याचे आश्वासन दिले.

प्रशालेचे उपमुख्याध्यापक एस.एस.रुपनर सर यांनी आभार व्यक्त केले. प्रशालेचे जेष्ठ क्रीडाशिक्षक प्रशांत मोरे सर ,श्री शेलार सर , कलाशिक्षक अमित वाडेकर सर,सेवक संजय गोसावी यांनी लेझीमच्या माध्यमातून पाहुण्यांचे स्वागत केले.सौ.भक्ती रत्नपारखी, सौ.अपर्णा अयाचित मॅडम यांनी पाहुण्यांचा सत्कार केला.

कार्यक्रमाचे निवेदन एस.एम. कुलकर्णी सर यांनी केले.यावेळी कवठेकर प्रशालेचे चंद्रशेखर राजूरकर सर, प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top