जैन समाजातर्फे ॲड चैतन्य भंडारी यांना पुरस्कार

जैन समाजातर्फे ॲड चैतन्य भंडारी यांना पुरस्कार

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार मुंबई व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे / ज्ञानप्रवाह न्यूज – धुळे येथील अरिहंत चॅरिटेबल ट्रस्ट व श्री महावीर जैन महिला सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठान तर्फे ॲड चैतन्य भंडारी यांनी देशभरात केलेल्या सायबर जनजागृतीच्या कार्याबाबत त्यांचा नुकताच सकल जैन समाजातर्फे सत्कार करण्यात आला.

या सत्कार समारंभात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, आमदार अनुप अग्रवाल, जैन सकल समाजाचे प्रतिष्ठीत नागरीक व अरिहंत चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नंदलाल रुणवाल, दिलीप बाफना, दिलीप पारख, नितीन खिंवसरा, मनोज लोढा यांच्या सह अरिहंत चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व सदस्य व श्री महावीर जैन महिला सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठानचे महिला पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मनोगत व्यक्त करताना ॲड चैतन्य भंडारी यांच्या सायबर क्षेत्रातील कामगिरी बद्दल कौतुक करुन त्यांना भविष्यातील वाटचालीबाबत शुभेच्छा दिल्या.

यावेळी जैन समाजातर्फे इतर मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जैन समाज बांधवांसह नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top