परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना माढा चे आमदार अभिजीत पाटील यांनी दिले निवेदन सकारात्मक चर्चा
मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/०१/२०२५ – राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मुंबईत भेट घेऊन माढा, मोडनिंब,करकंब, टेभूर्णी या ठिकाणच्या बसस्थानक सुशोभीकरण अद्यावत करण्यात यावे या संदर्भात त्यांना निवेदन माढा चे आमदार अभिजीत पाटील यांनी दिले.

कुर्डूवाडी आगारात फक्त ५२ गाड्या आहेत व ११० गावे आहेत त्यामुळे नागरिकांना प्रवासासाठी गाड्या कमी पडतात. नादुरुस्त बसमुळे शाळेच्या मुलांना व प्रवाशांना नाहक त्रास होतो आहे.त्यासाठी गाड्या लवकरात लवकर नवीन गाड्या उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
तसेच पंढरपूर येथील चंद्रभागा यात्रा बस स्थानकामधील नवीन बांधकाम करुन तयार आहे.टेंडर प्रक्रिया न केल्यामुळे गाळे वापरात नसलेल्या गाळ्यांच्या प्रलंबित प्रश्न आहे. हा प्रश्न मार्गी लागल्यास नवीन व्यवसाय सुरू होऊन तरुण उद्योजक होतील व नागरिकांना फायदा होईल. बंद असलेली वास्तू सुरु होईल या संदर्भात चर्चा करून पुढील कार्यवाही करण्यात साठी अधिकारी वर्गाला सूचना दिल्या आहेत.

यावेळी पुढील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली – १.माढा येथील एस.टी.बस स्थानक अद्यावत करणे.२.मोडनिंब येथील एस.टी.बस स्थानक अद्यावत करणे.३. करकंब ता.पंढरपूर येथील एस.टी.बस स्थानक अद्यावत करणे.४. टेंभुर्णी येथील एस.टी. बस स्थानक अद्यावत करणे.५. माढा तालुक्यातील कुर्डुवाडी आगारासाठी नवीन बसेस मिळणे.६. श्रीक्षेत्र पंढरपूर येथील चंद्रभागा यात्रा बस स्थानकातील गाळ्यांच्या प्रलंबित विषय मार्गी लावणे.
या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे माढा चे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.

