देशसेवेची तळमळ मनात घेऊन या अकॅडमीत येणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांची मेहनत बघितली की हा उपक्रम सार्थकी लागल्याचं समाधान मिळतं

मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज- मंगळवेढा तालुका गावभेट दौऱ्यात खासदार प्रणिती शिंदे यांनी बालाजीनगर येथील स्व.भारत नाना भालके करिअर अकॅडमीस भेट देऊन संस्थेची माहिती जाणून घेतली आणि प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा देताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या,अंगावर वर्दी घालून देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या मंगळवेढा आणि आसपासच्या परिसरातील तरुणांसाठी स्व.भारत नाना भालके करिअर अकॅडमी अतिशय चांगले काम करत आहे.

या अकॅडमीच्या माध्यमातून सैन्य/पोलीस दलात भरती होण्याची इच्छा असणाऱ्या तरुण-तरुणींना लेखी आणि मैदानी अशा दोन्हीही प्रकारचं प्रशिक्षण मिळत आहे. या प्रशिक्षणामुळे अनेक तरुण-तरुणी विविध दलांमध्ये तैनात होऊन देशसेवा करण्याचे ध्येय बाळगून आहेत.देशसेवेची तळमळ मनात घेऊन या अकॅडमीत येणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांची मेहनत बघितली की हा उपक्रम सार्थकी लागल्याचं समाधान मिळतं अकॅडमीतील सर्व प्रशिक्षणार्थींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी अकॅडमी चे संचालक श्रीकांत पवार, सोलापूर जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, मंगळवेढा काँग्रेस युवक अध्यक्ष रविकरण कोळेकर, संदीप पवार आदी उपस्थित होते.