युवा नेते प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपुरात रक्तदान महासंकल्प शिबिराचे आयोजन
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/१२/२०२४ – पांडुरंग परिवाराचे युवा नेते प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त आज पंढरपुरात रक्तदान महासंकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरामध्ये तब्बल ३४५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.यानिमित्ताने परिचारक वाड्यावर कार्यकर्त्यांच्या अलोट गर्दीचा जनसागर उसळला होता. परिचारकांची लोकांप्रती असणारी श्रीमंती प्रणव परिचारक यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पांडुरंग परिवार युवक आघाडी, प्रणव परिचारक युवा मंच आणि परिचारक गटाकडून रक्तदान संकल्प दिवस साजरा केला जातो. गेल्या दहा वर्षापेक्षा अधिक काळ रक्तदानाचा संकल्प प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने अनेक युवक करताना दिसतात. यंदाही परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परिचारकांच्या वाड्यासमोरच रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.सकाळी आठ वाजल्यापासूनच रक्तदानासाठी मोठ्या संख्येने तरुण वर्गाने गर्दी केली होती. पंढरपूर शहर तालुक्यासह मंगळवेढा शहर तालुक्यातील तरुण देखील परिचारकांना शुभेच्छा देऊन रक्तदान करण्यासाठी दाखल झाले होते.

सकाळी आठ पासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत कार्यकर्त्यांचा मोठा राबता आणि रक्तदानासाठीची गर्दी परिचारक वाड्यावर होती.प्रणव परिचारक यांची ग्रंथतुला,साखर तुला आणि वस्त्र तुला अशा प्रकारच्या तुला करून सर्वसामान्यांना वाटप करण्याचा अनोखा उपक्रम मित्रमंडळी यांच्यावतीने करण्यात आला. शैक्षणिक साहित्यचे वाटप देखील या निमित्ताने करण्यात आले. विविध सामाजिक उपक्रमातून आजपासून पुढील आठवडाभर परिचारक यांचा वाढदिवस साजरा होणार आहे.

प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनासाठी सोलापूर जिल्ह्याचे नेते मा.आ. प्रशांत परिचारक यांच्या हस्ते तसेच अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांच्यासह तालुक्यातील जेष्ठ नेते, पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक यांच्यासह सहकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
