मंगळवेढ्याचे पो.नि.ढवाण यांचा पोलीस अधिक्षकांनी प्रशस्तीपत्रक देवून केला सत्कार
विधानसभेची निवडणूक कुठलाही अनुचीत प्रकार न घडता शांततेत पार पाडल्याने पोलीस अधिक्षकांनी घेतली दखल..
मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणूक प्रक्रिया कुठलाही अनुचीत प्रकार न घडता शांततेत पार पाडल्या प्रकरणी मंगळवेढ्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना प्रशस्तीपत्रक देवून सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी गौरव केला आहे.

महाराष्ट्रात दि.20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूका पार पडल्या यामध्ये पंढरपूर- मंगळवेढा या मतदार संघाचाही समावेश होता.मंगळवेढा तालुक्यात 12 गावे संवेदनशील म्हणून पोलीस प्रशासनाने घोषीत केली होती. मात्र येथेही शांततेत मतदान प्रक्रिया पुर्ण झाली. साधा किरकोळ स्वरुपाच्या गुन्ह्याचीही नोंद न झाल्याने पोलीस प्रशासनाची मान उंचावली असून याची पोलीस अधिक्षक कार्यालयाने दखल घेतली गेली. प्रत्येकवेळी निवडणूकी दरम्यान किरकोळ बाचाबाचीचे प्रकार घडत असतात. यंदा मात्र असा कुठेही प्रकार घडल्याचे दिसून आले नाही.मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात मतदान केंद्रावर बारकाईने लक्ष ठेवत शांततेत प्रक्रिया पो.नि.महेश ढवाण यांनी पार पाडल्याबद्दल जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी दखल घेवून ढवाण यांना प्रशस्तीपत्रक देवून नुकतेच त्यांना सोलापूर येथे गौरविण्यात आले आहे.
मंगळवेढ्याचे पो.नि.महेश ढवाण यांना प्रशस्तीपत्रक देवून गौरवताना पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी छायाचित्रात दिसत आहेत.
