ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बसवण्या बाबत पोलीस निरीक्षकांना काँग्रेसच्यावतीने निवेदन
मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी,दि. १३/१२/२०२४- मंगळवेढा तालुक्यामध्ये चार साखर कारखाने आहेत.साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सध्या सुरू आहे.रात्री आपरात्री वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व बैलगाडी यांना पाठीमागून रिफ्लेकटर नसल्यामुळे सातत्याने अपघात घडत आहेत. आतापर्यंत बरेच जण या अपघातामुळे मृत्यूमुखी पडले आहेत व काही जणांना अपघातात अपंगत्व आले आहे.

मंगळवेढा मध्ये संत दामाजी कारखाना मंगळवेढा,युटोपियन शुगर कचरेवाडी, फॅबटेक शुगर नंदुर,भैरवनाथ शुगर लवंगी आदी कारखाने सुरू आहेत.या कारखान्यांना मंगळवेढा तालुका तसेच मोहोळ ,पंढरपूर तसेच कर्नाटकामधून ऊस पुरवठा होत आहे. रात्री आपरात्री येणाऱ्या ट्रॅक्टर व बैलगाडी वर रिफ्लेक्टर नसल्यामुळे पाठीमागून अंधारात मोटरसायकल चालक,चारचाकी वाहने धडकण्याची शक्यता आहे.
त्यामुळे ज्या गाड्यावर रिफ्लेक्टर नाहीत त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी मंगळवेढा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना मंगळवेढा तालुका काँग्रेस व युवक काँग्रेस तर्फे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी मंगळवेढा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अँड. रविकिरण कोळेकर,अँड.राहुल घुले,महेश दत्तू,संदीप फडतरे, अनिल रणदिवे, शाहरुख बेग, संदीप पवार आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
