ईडीच्या नावाने येणा-या बनावट नोटीसपासून सावधान – ॲड.चैतन्य भंडारी

धुळे /ज्ञानप्रवाह न्यूज- सध्या सायबर गुन्हेगारांनी ईडी आणि इन्कम टॅक्सच्या बनावट नोटीसीच्या नावाने मध्यमवर्गीयांची फसवणूक करण्याचा एक नविन फंडा शोधला आहे. ज्यात सायबर गुन्हेगार नागरिकांना असे भासवतात की तुमच्या क्रेडीट आणि डेबीट कार्डवरुन २० ते ३० लाखापर्यंतचे संशयास्पद व्यवहार झालेले दिसत आहेत. म्हणून आम्ही तुम्हाला ईडी डिपार्टमेंटतर्फे नोटीस पाठवलेली आहे .तुम्ही सदर नोटीसीप्रमाणे आम्हास आपल्याला ताबडतोब अटक करावी लागेल आणि जर अटक टाळावयाची असेल तर तुम्हाला आम्हाला २० ते ३० लाखापर्यंतचे संशयास्पद व्यवहाराची १० टक्के रक्कम ईडी डिपार्टमेंटला अदा करावी लागेल जेणेकरुन तुमची आणि तुमच्या परिवाराची समाजात बदनामी होणार नाही व कुठल्याही प्रकारची पेपरबाजी व सोशल मिडीयात तुमची बदनामी होणार नाही.

अशा फसव्या ईडी किंवा इन्कम टॅक्सच्या नावाने येणा-या नोटीस, फोन कॉल किंवा ईमेलला नागरिकांनी बळी पडू नये, कारण ईडी डिपार्टमेंटचा कोणताही अधिकारी सामान्य नागरिकांना कॉल करीत नाही किंवा नोटीस पाठवित नाही. ही फक्त सामान्य नागरिकांच्या मनात ईडी आणि इन्कम टॅक्सच्या नावाने भिती निर्माण करुन नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचा एक नविन फंडा सायबर गुन्हेगारांनी शोधून काढला आहे.
तरी नागरिकांनी याबाबत सावधानता बाळगावी आणि आपल्यासोबत असे गुन्हे झाले असल्यास टोल फ्री नंबर १९३० वर संपर्क साधावे असे आवाहन सायबर तज्ञ ॲड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.
