फुलचिंचोली येथे कायदेविषयक शिबीर संपन्न
जागतिक पाणी दिवस व जागतिक वसुंधरा दिना निमित्त जनजागृती
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.26: राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या किमान समान शिबीर कार्यक्रमा अंतर्गत तालुका विधी सेवा समिती पंढरपूर व पंढरपूर अधिवक्ता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, फुलचिंचोली येथे तालुका विधीसेवा समिती अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एम. बी.लंबे यांच्या मार्गदर्शनाखाली व दिवाणी न्यायाधीश श्रीमती पी.बी.घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक पाणी दिवस व जागतिक वसुंधरा दिन विषयी जनजागृतीपर कार्यक्रम तसेच कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.

जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश श्रीमती पी. बी.घोरपडे यांनी शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थींना पिण्याच्या पाण्याचे महत्व पटवून दिले तसेच पर्यावरणाविषयी जनजागृती करुन त्याबाबत अमलात आलेले कायदे विषयक मार्गदर्शन केले. तसेच वसुंधरा दिना निमित्त प्रत्येक विद्यार्थी किमान दोन झाडे लावावी असे आवाहनही केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील यांनी केले. सूत्रसंचालन ॲड. राहुल बोडके यांनी केले. आभार उपाध्यक्ष ॲड शशिकांत घाडगे यांनी मानले.
या कार्यक्रमास सह सचिव ॲड शक्तीमान माने,ॲड.व्ही.एम. सरवळे,ॲड.सागर गायकवाड, गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे, शाळेचे मख्याध्यापक तुकाराम कांबळे तसेच न्यायालयीन कर्मचारी के.के.शेख, बी.एस.गोरट्याल, विवेक कणकी , संबधित शाळेचे शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.