Constitution Day 2024 संविधान दिन कधी आणि का साजरा केला जातो?



जगातील सर्वात मोठे संविधान असलेला देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात संविधानाचा अखेर कधी स्वीकार झाला? कोणत्या दिवशी साजरा केला जातो? हा दिन का साजरा केला जातो ? जरी आपल्याला याबद्दल माहिती नसेल तर जाणून घ्या महत्तवाची माहिती-

 

संविधान दिन कधी साजरा केला जातो

26 जानेवारी 1950 रोजी भारतामध्ये संविधान लागू झाला असला तरी त्याला यापूर्वीच मान्यता मिळाली होती. 26 नोव्हेंबर 1949 रोजी, संविधान लागू होण्याच्या दोन महिने आधी, अनेक फेऱ्यांच्या चर्चेनंतर आणि सुधारणांनंतर संविधान सभेने अखेर संविधान स्वीकारले. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

 

संविधान दिन का साजरा केला जातो?

देशातील जनतेला संविधानाची जाणीव व्हावी यासाठी संविधान दिन साजरा केला जातो. देशातील प्रत्येक नागरिकाला संविधानिक मूल्यांची माहिती व्हावी, यासाठी संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दिवशी देशाने संविधान स्वीकारले होते, त्यामुळे सामाजिक न्याय मंत्रालयाने 19 नोव्हेंबर 2015 रोजी निर्णय घेतला की देश 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करेल.

 

संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय कधी घेण्यात आला

संविधान दिन साजरा करण्याच्या निर्णयामागे त्याचे निर्माते डॉ. भीमराव आंबेडकर यांचे नाव जोडलेले आहे. खरं तर 2015 मध्ये सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षात 26 नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय अधिसूचित केला होता. या निर्णयानंतर दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस राष्ट्रीय कायदा दिवस म्हणूनही ओळखला जातो.

 

संविधानाचे महत्त्व

डॉ.आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये अनेक तत्त्वे आणि उदाहरणे समाविष्ट आहेत, ज्यांच्या आधारे देशातील सरकार आणि नागरिकांसाठी मूलभूत राजकीय तत्त्वे, कार्यपद्धती, अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, कायदे इत्यादी ठरवण्यात आले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top