अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वात या कारखान्यास गतवैभव प्राप्त होईल-संचालक तुकाराम मस्के

श्री विठ्ठलच्या गळीत हंगामाचा शुभारंभ

हंगामात कारखान्याकडे ४०१४५ एकर ऊसाची नोंद असून त्यामधुन १२.१० लाख मे.टन ऊसाचे गाळप होईल-कार्यकारी संचालक रविंद्र पाटील

अभिजीत धनंजय पाटील यांच्या नेतृत्वात या कारखान्यास गतवैभव प्राप्त होईल – संचालक तुकाराम मस्के

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/११/२०२४ : श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचा सन २०२४-२५ गळीत हंगामाचा ४३ वा गळीत हंगाम शुभारंभ बुधवार दि. २१.११.२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता या शुभसमयी ह.भ.प.किरण बोधले महाराज, श्री संत माणकोजी महाराजांचे वंशज, श्री क्षेत्र पंढरपूर यांचे हस्ते व डीव्हीपी उद्योग समुहाचे कार्यकारी संचालक अमर पाटील, स्वेरी कॉलेज संस्थापक सचिव डॉ.बी. पी.रोंगे सर व कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता ताई रोंगे यांचे उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला.

सदर कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक रविंद्र पाटील हे प्रास्ताविकपर भाषणात बोलताना म्हणाले की,या गळीत हंगामात कारखान्याकडे ४०१४५ एकर ऊसाची नोंद झालेली असून त्यामधुन १२.१० लाख मे.टन ऊसाचे गाळप होईल.ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांच्या ऊसाचे वेळेत गाळप होणेसाठी कारखान्याने पुरेशी ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा उभी केलेली आहे.

सदर प्रसंगी बोलताना कारखान्याचे संचालक तुकाराम मस्के सर म्हणाले की,आपल्या कारखान्यास कै.औदुंबर आण्णा पाटील यांना अभिप्रेत असलेला चेअरमन मिळालेला असल्यामुळे अभिजीत धनंजय पाटील यांच्या नेतृत्वात या कारखान्यास गतवैभव प्राप्त होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी ह.भ.प.श्री किरण बोधले महाराज हे आपल्या अध्यात्मिक शैलीमध्ये विचार व्यक्त करताना म्हणाले की,श्री विठ्ठल कारखान्यामागे फार मोठी आध्यात्मिक शक्ती असून श्री विठ्ठल कारखान्याला अनेक साधू संताचे आशिर्वाद लाभले आहेत.

कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील हे जनतेचे प्रश्न सोडविणेसाठी सतत प्रयत्नशिल असून त्यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना निश्चित प्रगतीपथावर राहील, असे ते म्हणाले व पुढील गळीत हंगाम यशस्वी होणेसाठी शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रम प्रसंगी बोलताना स्वेरी कॉलेजचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे सर म्हणाले की,कारखान्याचे चेअरमन अभिजीत धनंजय पाटील यांचे नेतृत्वात गत दोन गळीत हंगाम उत्कृष्टपणे चालविले असुन उच्चांकी दर दिलेला आहे. या कारखान्याच्या स्थापित गाळप क्षमतेचा पुरेपुर वापर करुन जास्तीत जास्त गाळप करण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. हा गळीत हंगाम ही यशस्वीपणे पार पाडणेसाठी सभासद व ऊस उत्पादक शेतकरी यांनी आपला संपुर्ण ऊस आपले श्री विठ्ठल कारखान्यास द्यावा,असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विठ्ठल प्रशालेचे प्रा.चव्हाण सर यांनी केले. कारखान्याचे तज्ञ संचालक सचिन पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

सदर कार्यक्रमाप्रसंगी कारखान्याचे संचालक सर्वश्री संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन वाघाटे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, दत्तात्रय नरसाळे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, श्रीमती कलावती महादेव खटके, सौ सविता विठ्ठल रणदिवे, तज्ञ संचालक सर्वश्री दशरथ जाधव, अशोक तोंडले, निमंत्रीत संचालक सर्वश्री धनाजी खरात, तानाजी बागल, उमेश मोरे, अंगद चिखलकर, अशोक घाडगे, गणेश ननवरे, समाधान गाजरे व कारखान्याचे जनरल मॅनेजर डी.आर.गायकवाड तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद, कंत्राटदार, व्यापारी व हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top