मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांना शिवसेना( उबाठा ) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा

मनसे उमेदवारास शिवसेना(उबाठा)पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा

मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांना वाढते पाठबळ

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पंढरपूर शहर पदाधिकारी आणि राष्ट्रीय रिपब्लिकन सेनेचा जाहीर पाठिंबा मनसेचे माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांच्या उपस्थितीत देण्यात आला.

यावेळी माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की दिलीप धोत्रे हे सर्वसामान्य माणसांसाठी धावून जाणारे नेते आहेत. यामुळे त्यांना सर्व क्षेत्रातील आणि समाजातील नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. त्यांनी राज ठाकरे यांचे विचार घराघरात पोहोचवण्याचे काम केले आहे यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना दिलीप धोत्रे म्हणाली की या मतदार संघात कोणताही विकास झाला नाही.युवक बेरोजगार झाला , महिलांसाठी रोजगार निर्मिती नाही मात्र निवडणुकीत उभारणाऱ्या उमेदवारांना याचं काहीही देणं घेणं नाही. ही निवडणूक गरीब विरुद्ध श्रीमंत अशी असल्याने माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की पंढरपुरात महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होत आहे. मात्र आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या कामामुळे प्रभावित होऊन स्थानिक उमेदवार म्हणूनच जाहीर पाठिंबा देण्यात आला असल्याचे सांगितले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर समन्वयक लंकेश काकासाहेब बुरांडे, शहर संघटक सचिन बनपट्टे, उपशहर प्रमुख विनायक वणारे, उपशहर प्रमुख तानाजी मोरे, उपशहर प्रमुख ईश्वर साळुंखे, युवासेना उपतालुका प्रमुख प्रणित पवार, शाखाप्रमुख निखिल पवार, शाखाप्रमुख पिंटू रेड्डी, विभाग प्रमुख पंकज डांगे, विभाग प्रमुख गणेश जाधव, शाखाप्रमुख विजय जाधव, भरत साळुंखे, ऋषिकेश वनारे, भाजपा शहर उपाध्यक्ष दीपक बंदपट्टे, भारतीय लोकशक्ती पक्ष शहराध्यक्ष शहराध्यक्ष गणेश जाधव,राष्ट्रीय रिपब्लिकन सेनेच्या आदी पदाधिकाऱ्यांनी मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांना जाहीर पाठिंबा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top