नगरसेवक लखन चौगुले यांचा कार्यकर्त्यासह भाजपमध्ये उद्योजक संजय आवताडे यांच्या उपस्थितीत प्रवेश
भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार समाधान आवताडे यांना गावोगावी चांगला प्रतिसाद
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/११/२०२४- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं आहे.भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार समाधान आवताडे यांनी गावोगावी जाऊन प्रचार चालू आहे.त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.विविध पक्षातील अनेक जण भाजपात प्रवेश करत आहेत तर काही समर्थन करत आहेत.

पंढरपूर नगरपरिषदेचे नगरसेवक लखन चौगुले,धनुभाऊ धोत्रे , रामा चौगुले, श्रीकांत चौगुले, दीपक चौगुले यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार समाधान आवताडे यांना पाठिंबा जाहीर केला व भारतीय जनता पार्टीमध्ये आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज चे चेअरमन व नामवंत उद्योजक संजय आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केला .

यावेळी बादलसिंह ठाकुर,माजी नगरसेवक सुनील डोंबे,संतोष डोंगरे,श्री शिंदे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.