प्रेस लिहिलेल्या वाहनाच्या माध्यमातून गैरप्रकार; चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

प्रेस लिहिलेल्या वाहनाच्या माध्यमातून गैरप्रकार; चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/१०/२०२४- पंढरपूर शहरात विविध ठिकाणहून चार चाकी, दुचाकी वाहने दाखल होत असतात यामध्ये प्रेस लिहिलेली वाहने मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत.प्रेस लिहिलेल्या वाहनांचा वापर समाजकंटकांनी अवैद्य व्यवसायासाठी करू नये यासाठी प्रेस लिहिलेल्या वाहनांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी पंढरपूर पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आली आहे.

याबाबतचे निवेदन पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ अर्जुन भोसले यांना देण्यात आले. यावेळी पंढरपूर शहरातील पत्रकार बांधव उपस्थित होते.

या देण्यात आलेल्या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की पंढरपूर शहरात गाडीवर प्रेस लिहिलेली दुचाकी, चार चाकी वाहने मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. यामध्ये काही समाजकंटक पत्रकार असल्याचे कोणतेही अधिकृत पत्र नसतानाही आपल्या वाहनांवर प्रेस लिहून याचा वापर अवैद्य व्यवसायासाठी करत असल्याचे अनेक वेळा दिसून येत आहे. तरी अशा प्रेस लिहिलेल्या वाहनांची चौकशी करून सदर व्यक्ती पत्रकार आहे का ? याची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी पंढरपूर येथील सर्व पत्रकार बंधूंच्या वतीने पंढरपूर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे यांच्यावतीने करण्यात आली आहे .

अशा अनधिकृत पत्रकारांकडून विविध शासकीय कार्यालयात तसेच सर्वसामान्यांना दमदाटी करून सतत त्रास देण्यात येतो त्यामुळे विनाकारण सर्वच पत्रकारांची बदनामी होवु लागली आहे यामुळे तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top