सन्मित्र ग्रुपच्या वतीने महर्षी वाल्मिकी जयंती व नवरात्र महोत्सव साजरा
पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर येथील सन्मित्र ग्रुपच्या वतीने महर्षी वाल्मिकी जयंती व नवरात्र महोत्सव साजरा करण्यात आला.

त्यानिमित्त शुक्रवार दि १८/१०/२०२४ रोजी दुपारी १२.०० ते ४.०० पर्यंत ज्योतिर्लिंग चौक संतपेठ पंढरपूर येथे श्री च्या महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

हा कार्यक्रम विक्रम माळी व राजन थोरात यांच्या हस्ते करण्यात आला.

सर्व भक्त मंडळांनी प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सन्मित्र ग्रुप संस्थापक अध्यक्ष विदुल अधटराव तर्फे करण्यात आले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.श्री च्या महाप्रसादाचा हा कार्यक्रम यशस्वीरित्यापणे पार पाडण्यासाठी सन्मित्र ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.