क्रांतिवीर वसंत दादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार सोलापूरचे संजय साळुंखे यांना जाहीर
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूरचे भूषण स्वतंत्रता सैनिक थोर हिंदुत्वनिष्ठ समाज सुधारक क्रांतिवीर वसंत दादा बडवे यांच्या नावाने दिला जातो.महाराष्ट्रात नामांकित क्रांतिवीर वसंतदादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार हा सोलापूरचे समाजसेवक संजय साळुंखे यांना देण्याचे प्रसिद्ध करण्यात आले आहे.
क्रांतिवीर वसंत दादा बडवे हे भारतीय स्वतंत्र संग्रामातील, हैदराबाद मुक्तिसंग्राम, गोवा लढा आदी लढ्यात सशस्त्र क्रांतिकारक होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराने प्रेरित होऊन आजन्म हिंदूत्वाचे कार्य स्विकारले. त्यांच्या जीवनातील अनेक साहसी घटनां मुळे ते पंढरपूर व महाराष्ट्रत एक आदर्श बनले होते. सुधीर फडके, बाबासाहेब पुरंदरे, पुण्याचे गणपतराव नलावडे,भालजी पेंढारकर यांचे ते खास मित्र होते.1956 चा महापूर व हिंदू महासभा कार्य व हिंदू महिला बचाव कार्य यांच्या अनेक कथा सांगितल्या जातात.त्यांच्या मृत्यू नंतर त्यांनी आपली सर्व मालमत्ता सावरकर पुतळा करण्यासाठी व हिंदुत्ववादी कार्य करण्यासाठी हिंदू महासभेला अर्पण केली होती.त्यांच्यासारखे धाडसी कार्य करणाऱ्या व्यक्तीला सन्मान देण्यासाठी व प्रोत्साहन म्हणून प्रतिवर्षी ट्रस्टच्या वतीने वरील पुरस्कार दिला जातो.
यापूर्वी सदर पुरस्कार मिलिंद एकबोटे, शिवशंकर स्वामी गोरक्षक, सनातनचे अभय वर्तक,ॲड पुनाळकर,धुळ्याचे हिरामण गवळी,मिरजचे सूर्यवंशी,थोर कलाकार शरद पोंक्षे हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय भाई देसाई श्रीराम सेना कर्नाटक चे प्रमोद मुतालिक थोर साहित्यिक एस एल भैरप्पा आदी मान्यवरांना अर्पण केले आहेत.
हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक करून त्यांचे आयुष्य बरबाद करण्याचे कुटिलकारस्थान काही धर्मांध शक्तींकडून अलीकडे मोठ्या प्रमाणात होत आहे त्याविषयी शासनाला व न्यायालयाला पण याचे गांभीर्य जाणवले आहे . सदर प्रकरणात युवतीचे मानसिक समुपदेशन करून हा नाजूक प्रश्न हळुवार पणे सोडवावा लागतो प्रसंगी अशा वेळी स्वतःच्या जीवावर बेतन्याचे प्रयत्न होतात. गेली अनेक वर्षे सोलापूर शहर व जिल्ह्यातील अशा अनेक प्रसंगी आपल्या धर्म महिलांना सावध करून त्यांना पुन्हा भ्रममुक्त करून संकटापासून वाचविण्याचे कार्य संजय साळुंखे यांनी केले आहे. ही संख्या शेकडोनी आहे शेकडो हिंदू कुटुंबाचा त्यांना दुवा मिळाला आहे. ते जिल्हा मजूर संघाच्या संचालक म्हणून कार्यरत आहेत. अनेक सामाजिक उपक्रमातून सक्रिय आहेत. त्यांच्या या कार्याचा सन्मान व पुढे प्रोत्साहन म्हणून हा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे.
क्रांतिवीर वसंत दादा बडवे यांच्या पुण्यतिथी दिनी त्यांच्या पुतळा विराजमान असणाऱ्या रुक्मिणी पटांगण व्हीआयपी गेट समोर शनिवार दिनांक 19 10 2024 या दिवशी सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम हा पुरस्कार मान्यवर साधू संतांच्या आशीर्वादात दिला जाणार आहे सदर पुरस्कार हा रोख रक्कम मानचिन्ह मानाचा हार शाल श्रीफळ कुंडलिनी कृपानांकित भगवा ध्वज व रोख अकरा सहस्त्र मात्र अशा स्वरूपाचा आहे प्रतिवर्षी एक लढाऊ कार्यकर्त्यास दिला जातो.
तरी सदर समारंभास नागरिकांनी अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन क्रांतिवीर वसंत दादा बडवे ट्रस्टचे अध्यक्ष अभयसिंह ईचंगावकर, विवेक बेणारे, महेश खिस्ते, शहर हिंदू महासभा अध्यक्ष विकास मोरे,ओंकार वाटाणे,महेश क्षीरसागर, गणेश बडवे महाजन आदींनी केले आहे.