कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहरातून रॅली संपन्न

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहरातून रॅली संपन्न

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०९/२०२४: येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय व यशवंत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदतीसव्या जयंतीनिमित्त फुलांनी सजविलेल्या रथातून पंढरपूरामधून रॅली काढण्यात आली.

या रॅलीचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेच्या मनेजिंग कौन्सिलचे सदस्य व माजी सचिव प्रिं. डॉ.जे.जी. जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य अमरजित पाटील, डॉ. राजेंद्र जाधव, सुनेत्राताई पवार, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.दादासाहेब साळुंखे, उपप्राचार्य डॉ.भगवान नाईकनवरे, उपप्राचार्य डॉ. तुकाराम अनंतकवळस, उपप्राचार्य प्रा. राजेश कवडे, अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत, अधिष्ठाता डॉ. अनिल चोपडे, मुख्याध्यापिका अनिता साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.

ढोल ताशा,लेझीम आणि टिपरी नृत्याने या रॅलीची रंगत वाढविली. या रॅलीत यशवंत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, रयत माउली सौ.लक्ष्मीबाई,आर्मीचे सैनिक यांचा जिवंत देखावा तयार केला होता.ही रॅली पंढरपूर शहरातून मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली.

या रॅलीच्या वेळी कर्मवीरांच्या प्रतिमेस रयतप्रेमी संतोष नेहतराव, बाळासाहेब नेहतराव, जयवंत माने, शंकर खरात, नवनाथ खरात, तानाजी खरात, महादेव लोहकरे, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, धर्मवीर शिवाजी आप्पा कोळी, राजकुमार लवटे, भारत भिंगे, राजू निंबाळकर, संजय मुळे, संत सद्गुरू गाडगे महाराज येथील अशोक माने,एम.एम.पावले यांनी पुष्पहार अपर्ण करून आदरांजली वाहिली.

ही रॅली यशस्वी करण्यासाठी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन प्रशासन, पंढरपूर नगर पालिका प्रशासन यांनी विशेष सहकार्य केले. रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ चंद्रकांत खिलारे आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रमेश शिंदे यांनी मानले. विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून रॅलीची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top