कर्मयोगी सु.रा.परिचारक बि-शेती, सह पतसंस्थाचे थकीत कर्जदार/जामीनदाराविरूध्द कोर्टाचा दिवाणी तुरूंगवासाचा आदेश
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – कर्मयोगी सु.रा.परिचारक बि-शेती, सह पतसंस्थाचे थकीत कर्जदार/जामीनदार सुभाष नारायण शिंदे रा. इसबावी ता. पंढरपूर यांचे विरूध्द में. कोर्टानी दिवाणी तुरूंगवासाचा आदेश केला.

यामधील हकीकत अशी की,पंढरपूर येथील सुप्रसिध्द व नामंकित कर्मयोगी सु.रा. परिचारक बि-शेती, सह पतसंस्थाचे मर्या तुंगत यांनी कर्ज वसुली प्रकरणी पंढरपूर येथील दिवाणी कोर्टात दरखास्त दाखल केली आहे.दरखास्तीमधील कर्जदार/जामीनदार सुभाष नारायण शिंदे यांना नोटीस मिळूनही संस्थेची संपूर्ण कर्जाची रक्कम परतफेड केली नाही म्हणून संस्थेतर्फे जामीनदार यांचे विरूध्द दिवाणी तुंरूगवास होणेबाबत अर्ज दिला होता.

सुभाष शिंदे यांना में.कोर्टासमोर हजर केले असता त्यांनी पैसे देण्यास असमर्थता दाखविली आहे. याकामी में.कोर्टानी प्रस्तुत दरखास्त ११ वर्षापासून प्रलंबित असून तसेच याकामी मोठी रक्कम येणेबाकी असल्याने जामीनदार यांना संस्थेचे दिवाणी तुंरूगवासाचा अर्ज योग्य वाटल्याने में.कोर्टानी सुभाष नारायण शिंदे रा.इसबावी ता.पंढरपूर यांना दि.०६/०९/२०२४ ते १०/०९/२०२४ पर्यंत ५ दिवसासाठी दिवाणी तुंरूगवासाची शिक्षा दिली आहे तसेच पुढील तारेखस पैसे न भरलेस शिक्षेत वाढ अथवा योग्य ती कारवाई करणेबाबत आदेश केलेला आहे.
थकीत कर्जदार यांचे विरूध्द में.कोर्टानी केलेल्या आदेशामुळे अर्जदार संस्था व तालुक्यातील इतर वित्तीय संस्था यांना दिलासा मिळाला आहे व थकीत कर्जदार यांचे विरूध्द कायदेशीर कारवाई होण्याचे संकेत मिळालेले आहेत.
