ही जरी दृश्ययुद्धे दिसत असली तरी सर्वात मोठे युद्ध भारतात चालू आहे त्याला रोखण्यासाठी सजग पत्रकारिता करायला हवी

आपल्या देशातही युद्ध सुरू आहे – डॉ.उदय निरगुडकर

पंढरपूर /अमोल कुलकर्णी/ ज्ञानप्रवाह न्यूज-युक्रेन रशिया, हमास इस्राईल ही जरी दृश्ययुद्धे दिसत असली तरी सर्वात मोठे युद्ध भारतात चालू आहे आणि त्याला रोखण्यासाठी सजग पत्रकारिता करायला हवी. लोकेशन ट्रेसिंग ने युक्रेन मध्ये महिला लहान मुले मारली जात आहेत,वंश विनाश केला जात आहेत पण भारतासारख्या मोठी लोकसंख्या असणाऱ्या देशात सोशल मीडिया माध्यमातून,जातीय दंगलींमधून रोज देश पोखरला जात आहे. स्त्री ही श्रेष्ठ माता आहे.पण बलात्कार या बातमी मधून आपण अमुक तमुक जातीचा उल्लेख करून आपण काय साध्य करतो ? यासाठी आपण समाजाला बातमीतून काय देतो,काय छापतो काय दाखवतो यासाठी सजग पत्रकारिता करावी असे प्रतिपादन डॉ.उदय निरगुडकर यांनी पंढरपूर येथे आयोजित माध्यमकर्मी कार्यक्रमात केले.

विश्व संवाद केंद्र पुणे व अभिनव विवेक प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसाठी कार्यशाळा सिंहगड कॉलेज येथे आयोजित करण्यात आली होती.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी 92 वर्षीय जेष्ठ मार्गदर्शक शिवदास भिंगे तर मान्यवर उज्वल दोशी होते.

पुढे बोलताना डॉ.उदय निरगुडकर म्हणाले की,अनेक देशात फिरताना एक गोष्ट जाणवत राहते की मूळ मातृभाषा विसरून चालत नाही व माध्यमात मात्र बोलीभाषा वापरताना होणाऱ्या गंमती,विनोदी किस्से सांगत त्यांनी विविध वृत्तवाहिन्यांमधून संपादकीय काम करीत असतानाचे अनुभव सांगितले. राजकारण आणि समाज यातून पत्रकारितेचा लागणारा कस हा अनुभवातून तयार होतो.भ्रष्ट व्यावसायिक पत्रकारिता करण्यापेक्षा पत्रकारितेमधून विविध उपक्रमातून उत्पन्न कसे निर्माण करता याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली.सैनिकांना पत्रव्यवहार, राखी,दिवाळी,गरीब शाळकरी मुलांना मदत, भाषिक वार्तापत्रे कशी प्रसारित केली त्यातून टी.आर.पी कसा वाढवला? असे अनेक अनुभव त्यांनी सांगितले.

सत्राच्या सुरुवातीला अभिजित पाटील यांनी वायूवेगबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वानंद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन ऍड.महेश वाळूजकर यांनी केले.

यावेळी प्राचार्य डॉ.कैलास करांडे,डॉ.रमेश सिद,अभिजित पाटील,योगेश कुलकर्णी, सचिन लादे यांचेसह पंढरपूर सांगोला,मंगळवेढा माळशिरस भागातून शंभर हुन अधिक पत्रकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top